कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पन्हाळ्यावरील नागांना दर्शन रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. पराशर मुनींच्या पन्हाळ्यावरील विष्णुरूपी पुत्रप्राप्तीसाठीच्या तपोसाधनेची झळ नागलोकांना होवू लागली. त्यामुळे त्यांनी पराशरांच्या तपात विघ्ने आणली. परंतु शेवटी शापभयाने नागलोक पराशरांनाच शरण जातात व सुरक्षित राहण्यासाठी योग्य जागेविषयी विचारतात. तेंव्हा पराशर मुनी त्यांना करवीर क्षेत्री जावून श्री अंबाबाईचे दर्शन घेवून देवीला याबाबत विचारण्यास सांगतात. त्यामुळे नागलोक अंबाबाईचे दर्शन घेवून तिची स्तुती करतात, असे या पुजेचे महात्म्य असल्याचे श्रीपूजक मकरंद मुनीश्वर व माधव मुनीश्वर यांनी सांगितले.